Sunil Thakare :: Open Source Evangelist

Sunil Thakare's blog…

क्रिकेट – खेळ मांडीयेला…

क्रिकेट – खेळ मांडीयेला…
नुकतेच तथाकथित क्रिकेट विश्वकपचे सामने पार पाडले आणि एकशे एकवीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील जनतेने जसा एककलमी कार्यक्रम हातात घ्यावा तसे स्वत:ला यात समर्पित करुन त्याचा आस्वाद घेतला. अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवून जनू लोकाचे कल्याणच केले. (लिंबू टिंबू देशांना मिळून प्रतिस्पर्ध्यांची संख्या वाढवली. काय तर म्हणे सोळा देश होते. आहो जगात एकशे नव्वद पेक्षा जास्त देश आहेत.)  विविध राज्याच्या शासनातर्फे या विजयी खेलाडूंवर बक्षिचांचा जणु पाऊसच चालू आहे. कोठुन उभी करणार ही रक्कम? जे सत्ताधारी राजकिय नेते हा बक्षिसांचा वर्षाव करित आहेत ते ही रक्कम स्वता:च्या खिशातून देणार आहेत का? तसे नसेल तर याचा बोजा अर्थातच सामान्य जनतेवर पडणार आहे. कोट्यावधी रक्कमेची बक्षिसे, प्लॉटस्, बंगले, निसर्गरम्य घर्, रेल्वेने अथवा विमानाने आजन्म मोफत प्रवास ही खिरापत वाटायला सुरुवात झाली आहे. खाजगी दूरचित्रवाणी चॅनलवाल्य़ानी कोट्यावधी रुपयाचा व्यवसाय केला. आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी आता हेच क्रिकेटर कोट्यावधी रुपयाची मागणी करणार. परिणामी सर्वच वस्तुंचा किमती वाढणार. क्रिकेटरेचे वा नेत्यांचे यात काय जाणार हॊ? त्यांना थॊडीच वस्तुंचा भाव माहीत असतो. त्यांना काय फरक पडणार आहे. आज ज्वारीचा भाव गव्हाच्या भावाच्या दुप्पट झाला आहे. गरिबांची भाकर आता याच भ्रष्ट नेत्यांनी महाग करुन टाकली आहे. ज्वारी पासुन म्हणे आता मदिरा होणार. भाकरीची भुक आता मदिरा पुर्ण करणार. याच नेत्यांचे व नवश्रिमंत लोकांचे चोचले पुरविण्यासाठी हीच गरीबांची भाकरी आता मोठमोठ्या स्टार होटेल मध्ये मिळणार अगदी सोन्याच्या भावात. आपल्याला काय माहित आपण तर बुवा क्रिकेटची मजा लुटत हो दरम्यान देशात काय चलले होते याचे भान सुद्धा नव्हते. अगदी राष्ट्रकुल घोटाळ्याचा सुद्धा विसर पडला हॊ. कसाबच्या शिक्षचे सुद्धा काय झाले माहीत नाही. काय करायचे आपल्याला. धोनी कसा धुतो याकडे सगळ्यांचे लक्ष. इकडे नेते, लुटारु, माफिये कधी धुवून गेली याचा पत्ताच लागला नाही. यात चॅनलवाले सुद्धा काय कमी नाहीत. टीआरपी वाढला म्हणचे त्यांची पोट् भरतात. आता हेच पहाना – टीव्ही पहाण्यासाठी दोनशे ते तिनशे रुपये महिना मोजायचे. मग कार्यक्रम सुरु होतो ना होतो तोच लगेच विश्रांती घेतात. कशाला पाहिजे हो पाच मिनिटात विश्रांती. पैसाकमवायचा असतो म्हणुन सांगा की कशाला खोट बोलतात विश्रांती घ्यायची म्हणुन. क्रिकेटच्या दरम्यान तर या चॅनलवाल्यांनी अगदी कळसच केला. म्हणे टीआरपी खुपच वाढला. मग कशाला ठेवतात ते पे चॅनल… कराना फ्री टू एअर. आजमितीला भारत देशापुढे अनेक समस्या आहेत. टिव्हीच काय तर गरीब जनतेला साधे स्वच्छ पाणी सुद्धा पिण्याकरीता मिळत नाही. मुंबईत अंतिम सामन्याच्या सुरक्षेसाठी कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला. कारण मोठमोठे राजकारणी नेते, अभिनेते, राज्यकरते, धनवान व्यक्ती हा सामना पहाण्यासाठी‌ होते. हे सर्व जन काही सामना पहाण्य़ासाठी आले नव्हते तर प्रत्येक जन आपली भाकरी भाजायला आले होते. कोणाला आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करयचे होते तर कोणाला आगामी निवडूकांची चाहूल लागली होती. प्रचंड लोक मैदानावर व टीव्हीवर सामना पहावयाला मग काय फक्त हात वर करायचा चॅनलवाले पुढच काम करतात. सामना जिंकण्यासाठी तर लोकांनी अगदी सर्व हद्दी पार केल्या. लोक ठिकठीकाणी प्रार्थना करु लागले, देवाकडे साकडे घालु लागले. लोक अगदी रस्तावर आले. कार्यालये ओस पडु लागले. भ्रष्टाचार, महागाई, अत्याचार याविरुद्ध कधी करता काहो असे कधी, येता का रस्त्यावर् यासाठी, विचारता का जाब?
असो…क्रांती थोडीच पाहिजे आहे आपल्याला. नंतर तेच नेते, त्याच निवडणूका. थॊडा फार बदल होतो. नेत्यांचे पक्ष बदलतात. कोणी एखादा नेता अगदी स्वर्गवासी झालाच तर त्यांचीच पुढची पिढी आहे की आपली सेवा करावयाला. (अंतिमसामन्य़ाचा विजयानंतर म्हणे एका खेलाडूच्य़ा पत्नी एका बड्या नेत्यांच्या (सद्ध्या मोठ्ठे मंत्री आहेत बाबां) भावी पिढी सोबत शिर्डीच्या साईबांबाचे दर्शन घेण्यासाठी गेली होती.)
असॊ…मग काय आयपीएल येतय लगेच…लागा तयारीला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>