Sunil Thakare :: Open Source Evangelist

Sunil Thakare's blog…

कॉम्पुटर व्हायरस…धास्ती कोणाची… कोणाला?

आजच्या घडीला प्रत्येकाकडे संगणक आहे. त्याच्या सर्वात जास्त फायदा कुणाला झाला असेल तर तो आहे अँटीव्हायरस वाल्यांचा. इंटरनेट सर्फ़िंग असो की सॉफ़्टवेअर चा वापर असो, सगळीकडे अगदी ज्याची धास्ती दाखवलेली असते ती व्हायरसची. आज सर्वत्र अँटीव्हायरस वाल्यांनी  अगदी वेठीस धरले आहे. अमुक अँटीव्हायरस घ्या अन् तमुक अँटीव्हायरस घ्या. प्रत्येकाने जणु आप-आपले दुकानच मांडले आहे. नुसता वीट येतो. हे अँटीव्हायरस टाकले नाही तर असे होईल अन् हे अँटीव्हायरस वापरले नाही तर तसे होईल. मग यातून काही  मार्ग आहे का? की सगळ बीनबोभाट पणे सहण करावयाचे. कोणास दोषी ठरवायच? दोष कोणाचा व्हायरासचा की अँटीव्हायरसवाल्यांचा?

दोघांचाही नाही… मग कोणाचा? तो आहे ऑपरेटींग सिस्टीमचा. सर्वांना अगदी Most Popular – Window Operating System (Ms-WindowS) पाहिजे असते. कशासाठी हो? लग्न केलय का Ms-WindowS शी? मग हवीय कशाला ती व्हायरस प्रतिकार शक्ती नसलेली ती ऑपरेटींग सिस्टीम??

यासाठी प्रथम सगंणक खरेदी करण्यापुर्वी खालील काही प्रश्न स्वत:ला विचारा:

 1. आपण संगणक कशासाठी घेणार आहोत याची प्रथम गरज ओळखा. ढोबळमानाने खालील प्रकारे त्याचे वर्गीकरण होईल:
  • इंटरनेट सर्फ़िंग साठी: इंटरनेट सर्फ़िंग व ई-मेल साठी आपणास आवशकता असते ती एका ब्राउजरची. त्यासाठी लागते ती एक ऑपरेटींग सिस्टीम (व्हायरसची प्रतिकार शक्ती असलेली!!). मग त्यासाठी Ms-WindowS कशाला पाहिजे? त्यासाठी पायरसी करावी लागते (करु नका) आणि समजा ती लिगल असेल तर त्यात अँटीव्हायरस टाका, परत त्यासाठी पायरसी करा (परत करु नका) व लिगल असेल तर सारखे त्याला री-न्यु करा अगदी पैसे  मोजुन . किती वेळेस? हेच धंदे करायचे की  संगणक वापरायचा कधी? मग यावर उपाय आहे का? व तो पण फ़ुकट?    हॊ आहे की,
   • त्यासाठी प्रथम आपणास Ms-WindowS शी नाते तोडावे लागेल.
   • प्रथम या वेबसाईट वर जा: http://www.ubuntu.com व आपल्या गरजे प्रमाणे उबुंटु चे वर्जन निवडा. जसे: Netbook Edition, Desktop Edition etc.
   • ऑपरेटींग सिस्टीम डाउनलोड करा व ती install करा.
   • व्हायरस फ़िरकणारसुद्धा नाहीत.
   • इंटरनेट साठी सर्वात सुरक्षीत मार्ग. यात इंटरनेट एक्सप्लोरर् सोडून सर्व ब्राउअजर आहेत.
   • स्पीड मध्ये सुद्धा प्रचंड फ़रक पडेल.

   मग हवीय कशाला ती व्हायरसची कटकट..

  • डेव्हलोपमेंटसाठी: डेव्हलोपमेंट साठीसुद्धा उबुंटु ही अत्यंत उपयुक्त ऑपरेटींग सिस्टीम आहे. यात खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
   • Languages: C, C++, FORTRAN, Java, Android etc.
   • Graphics: GIMP (Like Photoshop), PhotoManage (Digital Camera Software), Inkscape (Vector Graphics)
   • Audio / Video: Tons of free softwares.
   • Website Development: PHP, Python, Eclipse (HTML and CSS editor)
   • Databse Server: MySQL, SQlite etc.
  • मल्टीमेडीया व एनीमेशन साठी: मल्टीमेडीया व एनीमेशन साठी साठीसुद्धा उबुंटु ही अत्यंत उपयुक्त ऑपरेटींग सिस्टीम आहे. उबुंटु चे Ubuntu Studio वर्जन यासाठी एकदम योग्य आहे.
 2. शिवाय सर्व एडिशन मध्ये ऑफ़ीस, ई-मेल क्लायंट, गेमस, मूव्ही प्लेयर ई. गोष्टी आहेत. अन् व्हायरसचा धोका आजीबात नाही. अगदी  अगदी व्हायरस इनफ़ेक्टेड युएसबी  पेन ड्राईव्ह वापरला तरी.

जर मुफ़्त पर्याय उपलब्ध असताना ऑपरेटींग सिस्टीमसाठी पैसे कशासाठी व का मोजायचे?

ubuntu

Ubuntu Software Center

आपणास जर या  संदर्भात आणखी काही मदत हवी असेल तर मला याच वेवसाईटच्या या : http://sunil.thakares.com/contact/ लींक वरुन संपर्क साधा. किंवा आपणास उबुंटुची सीडी हवी असेल तरीदेखील कळवा. यात जवळपास ३२,००० प्रोग्रामस् आहेत.

 

 

 

 

 

 

 

काय मग वापणार की नाही उबुंटु लिनक्स्  ते पण अगदी दिमाखात. व्हा मुक्त मग व्हायरसच्या विळख्यातुन व अँटीव्हायरसवाल्यांचा जाचातुन……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>